esakal | ...म्हणून मनसेच्या मोर्चात माझ्या गाड्या, भाजप आमदार महेश लांडगेंचं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh.gif

...म्हणून मनसेच्या मोर्चात माझ्या गाड्या, भाजप आमदार महेश लांडगेंचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुंबईमध्ये आज मनसेच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. पुण्यामध्ये या मोर्चासाठी भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मनसे कार्यकर्त्यांना वाहनं पुरवल्याचा आरोप आहे. यावर आता महेश लांडगे यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. 

आमदार लांडगे म्हणाले, “माझा वाहतुकीचा व्यवसााय असल्याने कार्यकर्ते माझी वाहनं घेऊन गेले असावेत, या मोर्चाशी आपला काही संबंध नाही. ''लांडगे पुढे म्हणाले, “माझा वाहतुकीचा व्यवसाय आहे. मी कंपन्यांना बस पुरवत असतो. आज रविवार असल्याने त्या गाड्या मनसेच्या कार्यकर्त्यांना दिल्या असतील. त्यामुळे माझी वाहनं हे कार्यकर्ते घेऊन गेले असतील. आम्हीसुद्धा भारतीय जनता पक्ष म्हणून CAA आणि NRC या कायद्याला समर्थन करतो. त्या कार्यक्रमाला जाणारे कार्यकर्ते हे भाजपचे आहेत, की नाही हे मला माहीत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पण, तिथे जाणारा माणूस हा सीएएलाच समर्थन करतोय, देशाच्या हितासाठी देशाच्या बाजूने त्याचं मत व्यक्त करत आहे. मग तो चांगल्याच कार्यक्रमाला गेला आहे. त्या चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल, तर माझी त्याला हरकत नाही. त्या काही भाजपच्या गाड्या नाहीत. तो माझा वैयक्तिक व्यवसाय आहे”, असे स्पष्टीकरण भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिले.

हे पण वाचा - आता कोरोना व्हायरसला घाबरायची गरज नाही; हे वाचा! 

मोर्चा कशासाठी...मुंबईत बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेकडून महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. मनसेचे पुण्यातील कार्यकर्तेही मोर्चासाठी येण्यास निघाले. विशेष म्हणजे यासाठी ज्या बसेस वापरल्या आहेत. त्या बसेस भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या आहेत. या बसेसवर आमदार महेश लांडगे यांचे नावही दिसत आहे. त्यामुळे भाजपने मनसेच्या मोर्चासाठी वाहनं पुरवल्याचा आरोप होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image