काँग्रेस, राष्ट्रवादीने थकविल्यानेच मुख्यमंत्री सुटीवर : राणे

वृत्तसंस्था
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

टीकेसाठी टीका करणे आणि विरोधला विरोध करणे याला अर्थ नाही. चांगल्याला चांगलं  म्हणावं, कृषी क्षेत्र, महिलांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने तरतूद केली आहे हे देखील विरोधकांनी लक्षात घ्यावं.

पिंपरी : राज्यातील सरकार गोंधळलेले आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टीवर गेले आहेत. गेल्या ६० दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना थकवले आहे. त्यामुळेच ते तीन दिवस सुट्टीवर गेले आहेत. कॅबिनेटमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतात. शिवसनेचे मंत्री हे टेबल वरील पेन आणि फाईल उचण्याचे काम करत असून कॅबिनेटमध्ये कारकूनासारखे बसलेले असतात, असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मावळमध्ये देविदास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात नितेश राणे सहभागी झाले होते. मावळ मधील शेतात काम करणाऱ्या पाच हजार महिला त्र्यंबकेश्वर दर्शन घेण्यासाठी मावळातून निघाल्या. त्या कार्यक्रमाला ते आले होते.

अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेवर बोलताना नितेश राणे म्हणाले, की आकड्यांच्या खेळापेक्षा पुढच्या महिन्यात गुंतवणूक करण्यासाठी तरुणांच्या हातात पैसा येईन तेवढा त्यांना आणि विरोधकांना अर्थसंकल्प कळेल. टीकेसाठी टीका करणे आणि विरोधला विरोध करणे याला अर्थ नाही. चांगल्याला चांगलं  म्हणावं, कृषी क्षेत्र, महिलांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने तरतूद केली आहे हे देखील विरोधकांनी लक्षात घ्यावं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Nitesh Rane attacks CM Uddhav Thackeray on holiday