भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ व्हायरल

भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ व्हायरल

पुण्यातील भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. भाजपचे पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ समोर आली आहे. या प्रकरणाची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही ऑडिओ क्लीप वर्षभराची असल्याचं बोललं जात आहे. मात्र, तरिही एखाद्या महिला आधिकाऱ्याला अशा शब्दात बोलणं कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेची महिला आधिकारी आणि भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यात झालेल्या संभाषणाची मोबाईलवरील ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आधिकारी महापालिकेच्या ड्रेनेज विभागात कार्यरत आहेत. कामानिमित्त कार्यकर्त्याच्या मोबाईलवरुन कांबळे यांनी संपर्क केला. त्यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेत, त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे स्पष्ट सांगितलं. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अर्वाच्च भाषा ऐकून महिला आधिकाऱ्याने फोन पुन्हा कार्यकर्त्याकडे दिला. पण कांबळे यांनी कार्यकर्त्याला फोन स्पीकरवर ठेवायला सांगितला. अन् पुन्हा शिविगाळ केली. त्यानंतर काही इतर आधिकाऱ्यालाही शिविगाळ केली.

महिला आधिकारी आणि आमदार कांबळे यांच्यातील संभाषण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पुढील काही दिवसात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका रंगणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही ऑडिओ क्लीप व्हायरल केल्याचं बोललं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com