भाजप नगरसेविकेच्या पतीची दादागिरी

भाजप नगरसेविकेच्या पतीची दादागिरी
Published on

भाजप नगरसेविकेच्या पतीची दादागिरी
कार्यालयात जाऊन अभियंत्यांना शिवीगाळ, दमदाटी

श्रीगोंदे, ता. २० : मी सांगूनही दुसऱ्याची क्रेन का लावली, असे म्हणत येथील नगरपरिषदेच्या नगरसेविका अश्‍विनी काळे यांचे पती प्रवीण काळे यांनी संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. नगरपरिषदेच्या कार्यालयात जाऊन दोन अभियंत्यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी दुपारी घडला.

नगरपरिषदेने झाड तोडण्यासाठी ठेकेदार नेमलेला आहे. गुरुवारी दुपारी त्या संबंधित ठेकेदाराचा कर्मचारी एका क्रेनच्या साहाय्याने नगरपरिषदेच्या जवळ एक झाड तोडत होता. यावेळी प्रवीण काळे यांनी तिथे येऊन, ‘मी सांगूनही तुम्ही ही क्रेन का लावली,’ असे म्हणून तिथे काम करणाऱ्या सचिन इंगळे याच्या कानशिलात लगावली. यावेळी तिथे नगरसेवक व अन्य मंडळी उपस्थित होते. त्यानंतर काळे यांनी नगरपरिषद कार्यालयात जाऊन तिथेही गोंधळ घातला. काळे यांनी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता सागर पडोळकर व विद्युत अभियंता आकाश सानप यांनाही शिवीगाळ करत दमदाटी केली.
या प्रकाराने नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांच्याकडून कामबंद आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे.
-----------
घडलेला प्रकार चुकीचा आहे. याबाबत नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांच्याशी चर्चा करणार आहोत. माफी न मागितल्यास नगरसेविका अश्‍विनी काळे यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव पाठविणार आहोत.
-पुष्पगंधा भगत, मुख्याधिकारी, श्रीगोंदे नगरपरिषद.
----------
कोणाला मारहाण, शिवीगाळ किंवा दमदाटी केली नाही. नक्कीच या प्रकरणाची चौकशी करावी, दोषी आढळल्यास शिक्षा भोगायला तयार आहे.
-प्रवीण काळे, श्रीगोंदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com