

Clash between BJP and NCP leaders over the inauguration credit of a health center in Balajinagar-Ambegaon
Sakal
पुणे : प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज मध्ये उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनावरून आज पक्षनेत्यांच्या बैठकीत स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विशेष म्हणजे या आरोग्य केंद्राचे उद्घाटन या दोन्ही पक्षांनी शनिवारी (ता. २७) स्वतंत्रपणे केलेले असताना त्याचा ठराव मंजूर करायचा की नाही यावरून वाद झाला.