

पुणे - भाजपच्या नेत्यांबद्दल अवमानकारक वर्तन केल्याने भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबतची पुणे महापालिकेतील युती तुटली अशी जाहीर घोषणा महापालिका सभागृहात केली होती. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा निधी शून्य करण्यात आला होता. हा वाद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता. अखेर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कान टोचल्यानंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना बैठक घेऊन मनोमीनल घडवून आणावे लागले आहे. त्यामुळे हा वाद पेल्यातील वादळ ठरले आहे.