Video : सरकारला खाली खेचण्याचा भाजपचा प्रयत्न नाही : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

सरकारला खाली खेचण्याचा कोणताही प्रयत्न भाजपचा नाही. आम्ही प्रबळ विरोधीपक्ष म्हणून काम करु. हे सरकार पाडण्यासाठी बाहेरून कोणी काही करण्याची गरज नाही'' 

पुणे : ''विरोधाला विरोध करणारे आम्ही नाही, राज्यातील अडचणी सुटावीत म्हणून आम्ही विस्तार करा असं म्हणत होतो. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याचा आनंद आहे.  उत्तम काम करावं. जनतेच्या भावना, अडचणी, दुःख दूर करावेत.' अशी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज खातेवाटप जाहीर झाल्यानंतर दिली.

संग्राम थोपटेंचं चुकलं काय?
 

सरकारला खाली खेचण्याचा कोणताही प्रयत्न भाजपचा नाही. आम्ही प्रबळ विरोधीपक्ष म्हणून काम करु. हे सरकार पाडण्यासाठी बाहेरून कोणी काही करण्याची गरज नाही'' असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

विधानसभेनंतर सुरु असेलेल्या राजकीय परिस्थितीनंतर मतदाराचा राजकारणावर विश्वास टिकेल का? याबाबत विचारले असता ते म्हणाले'' इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात प्रमाणिकपणाचे राजकारण व्हायचे. यावेळी काय झालंय माहीत नाही. जसं अवकाळी पाऊस, गारपीट हे जसं अनाकलनीय आहे, तसं अगदी राजकारण ही अनाकलनीय आहे. जनता निराश न होता त्यांना 'दूध का दूध, पाणी का पाणी' हे करेल. त्यामुळेच निवडून आलेल्या सदस्यांची मोठ बांधून आमच्याविरुद्ध जिंकणं, झेडपी-कोल्हापूर जिंकली हे सोपं आहे ना? नव्याने जेंव्हा निवडणुका होतील तेंव्हा चित्र उलट असेल. जनता आता भाबडेपणाने नव्हे तर सतर्कतेने मतदान करेल. निसर्गाचं जसं संतुलन बिघडलं तसं राजकारणातील संतुलन ही बिघडलं. पण सध्याच्या राज्यातील राजकारणामुळं लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडणार नाही
 

अजित पवारांना अर्थमंत्रीपद, तर वळसे पाटील आणि दत्ता भरणेंना 'ही' खाती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP is not trying to pull government down said Chandrakant Patil