BJP’s Secret Candidate Notification Strategy
पुणे : भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरून तारखांचा लपंडाव सुरु केला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागलेला असताना आता भाजपकडून उमेदवारी यादी जाहीर केली जाणार नाही. ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे अशांना थेट फोन करून अर्ज भरण्याचा निरोप दिला जाणार आहे. त्यांना पक्षातर्फे ए, बी फॉर्मही पोहच केला जाणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने ही चाल खेळली आहे.