

BJP Orders Strict Ban on Unofficial Flex Banners in Pune
sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनधिकृत फ्लेक्स लावून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपने त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून, यापुढे भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून शहर घाण करू नये असे आदेश भाजपतर्फे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.