Political U-turn: BJP’s Nominated Corporators to Serve Full 5-Year Term
sakal
पुणे ः महापालिका निवडणुकीत अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचे गाजर भाजपने दाखवले होते. जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी स्वीकृत नगरसेवकपद अडीच वर्षासाठी दिले जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आज महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर पाच वर्षासाठी नियुक्ती केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ज्यांना पुढच्या अडीच वर्षांनी संधी दिली जाणार होती, त्यांचा आता कायमचाच पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.