राज्यसभेसाठी भाजपकडून २५ नेते इच्छुक

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची माहिती

राज्यसभेसाठी भाजपकडून २५ नेते इच्छुक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची माहिती

Published on

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२७ ः राज्यसभेच्या सात जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार असून यातील चार जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येणे निश्चित आहे. या चार जागांसाठी २५ नेते इच्छुक असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चव्हाण हे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर चार नावांची घोषणा दोन मार्चला केली जाणार असल्याचे समजते. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास तीन मार्चपासून सुरुवात होईल. त्यामुळे उमेदवार निवडीचा निर्णय पक्षाला लवकर घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अलीकडेच झालेल्या कोअर समितीच्या बैठकीत इच्छुकांच्या नावावर चर्चा झाली होती.
‘‘भाजप आणि महायुतीमधील पक्ष राज्यसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. आवश्यक असणाऱ्या सर्व जागा आम्ही १०० टक्के जिंकणार याची खात्री आहे. उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही काम करू,’’ असे चव्हाण यांनी सांगितले.

ही नावे आघाडीवर
भाजपकडून राज्यसभेसाठी विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, डॉ. भारती पवार, प्रीतम मुंडे, दिलीप कांबळे, अमर साबळे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, कुणाल पाटील आदी नावे आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com