

पुणे - ‘केंद्रांमध्ये कमलनाथ नगरविकासमंत्री असताना त्यांनी पुण्याच्या मेट्रोला परवानगी दिली आणि मी मुख्यमंत्री असताना माझ्याच हस्ते भूमिपूजन झाले. भाजपने विनाकारण फुशारक्या मारू नये. स्मार्ट सिटी, हायपरलूपचे काय झाले, ते आधी सांगावे. घोषणा करायला पैसे लागत नाहीत. चुकीच्या योजना राबवून तिघेही पुण्याची लूट करीत आहेत,’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी भाजपवर जळजळीत टीका केली.