भाजप कामगार आघाडीची सोलापूर शहर कार्यकारिणी जाहीर

भाजप कामगार आघाडीची सोलापूर शहर कार्यकारिणी जाहीर
Published on

भाजप कामगार आघाडीची
सोलापूर शहर कार्यकारिणी जाहीर

३९ पदाधिकाऱ्यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २८ : भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत विविध पदांवर ३९ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगारांच्या प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व आघाडीचे संयोजक सुनील गौडगाव यांनी कार्यकारिणी जाहीर केली आहे. श्रीधर चिट्याल, जगन्नाथ चव्हाण व मकबूल मुल्ला यांची सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गिरीश बत्तूल यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची, आनंद भंवर यांच्याकडे शहर उत्तर संयोजकपदाची, तर सतीश भरमशेट्टी यांच्याकडे शहर उत्तर सहसंयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय यादगीरी बोम्मा व संतोष कदम यांची शहर मध्य संयोजक व सहसंयोजक, दत्ता सूर्यवंशी व आशीष वाघमारे यांची शहर दक्षिण संयोजक व सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे. धीरज कुमार यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्यांमध्ये राम दाते, किरण भंडारी, विश्वनाथ बदलापूरे, गोरीशंकर कोडगीमठ, शिव पुजारी, हणमंत फुलारी, जगन्नाथ गायकवाड, राजू जमादार, किसन जाधव, बाबू उपलवार, भीमाशंकर जावळे, विजय धोत्रे, रणजित हजारे, मुकेश गोरलेवाले, नवनाथ साळुंके, लक्ष्मण कोळी, तिप्पण्णा केंचगुंडी, शाम काकी, अनिल वाघमारे, मोहन क्षीरसागर, नामदेव कुणी, विजय पवार, प्रभाकर कांबळे, अशोक दुस्सा, संतोष राजपूत, श्रीनिवास वंगारी आणि अमरनाथ दामा यांचा समावेश आहे.

चौकट...
शहर कोअर कमिटीत १४ जण
शहर भाजप कोअर कमिटीत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, शहर प्रभारी योगेश टिळेकर, जिल्हा सरचिटणीस नारायण बनसोडे, शिवराज सरतापे आणि सुधा अळ्ळीमोरे यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्र्यांच्या गटातून पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार-आमदारांच्या गटातून विजय देशमुख, देवेंद्र कोठे आणि सुभाष देशमुख यांना स्थान देण्यात आले आहे. महापौर विनायक कोंढ्याल यांचाही यात समावेश असून, माजी शहराध्यक्ष, महापालिकेतील पक्षनेते नरेंद्र काळे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या गटात जयसिद्धेश्वर महास्वामी आणि विक्रम देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com