

Ravindra Chavan
ESakal
पुणे - देशात झालेले जेनजी चे आंदोलन, काँग्रेस नेते राहूल गांधी यांचा झालेला पुणे दौरा, राज्यात सुरु असलेली विद्यार्थ्यांची आंदोलन अशा घडामोडी घडत असताना भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी (दि. ३१) पुण्यात होणार आहे. या बैठकीत पक्षाकडून कोणते ठराव मंजूर केले जातात, आगामी काळात कशा पद्धतीने काम करायचे यावरून पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन केले जाते याकडे लक्ष लागले आहे.