"संपूर्ण निवडणुकीत हिंदुत्वाविषयी चर्चा केलीचं नाही" भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा| Kasba Bypoll Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election

"संपूर्ण निवडणुकीत हिंदुत्वाविषयी चर्चा केलीचं नाही" भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा| Kasba Bypoll Election

कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तळ ठोकला आहे. तर आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने दोन्ही मतदारसंघात चांगलेच वातावरण तापले आहे.

भाजपने कसब्याची जागा प्रतिष्ठेची केली असून पुर्ण ताकत पणाला लावली आहे. दरम्यान आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेमंत रासने यांच्या प्रचारात बोलताना शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, कसब्या मधील जनतेवर आम्हाला विश्वास आहे

या निवडणूकीमध्ये भाजप आणि महायुती १०० टक्के जिंकेल या स्थितीत आम्ही आहोत. मात्र मागील या भागात पुनर्विकास जो इथे थांबला आहे ते मोदीजी आणि एकनाथजी यांचे डबल इंजिन सरकार आता पूर्ण करणार आहे.

तर शरद पवारांवर टीका करताना म्हणाले, शरद पवार यांच्या सभेला एका नेत्याने जे मुस्लिम लोकं आणा आणि मतदान काँग्रेसला करा ही जी हिंदुत्ववादी विरोधी भूमिका शरद पवार यांच्या सभेतून झाली.

मुस्लिम समाजाचे नाव घेऊन हिंदूंच्या विरोधी चर्चा आम्ही कधीच केली नाही, मात्र शरद पवारांकडून हे अपेक्षित नव्हते त्यांनी थांबवायला पाहिजे होतं, आम्ही कधी ही हिंदुत्ववादी विरुद्ध इतर असा चेहरा कधी ही तयार केला नाही, त्यामुळे एक ही ब्राह्मन मतदार नाराज नाही.

टॅग्स :Sharad PawarBjp