भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले, मग सुरू झाले... 

bjp
bjp

बारामती (पुणे) : केंद्रीय पथकास निवेदन देण्यास प्रतिबंध केल्याचा आरोप भाजपच्या वतीने केला गेला, तर पोलिसांच्या सूचना मान्य न करता विनापरवाना गाडी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय आवारात नेल्याने भाजप नेत्यांना नोटीस दिल्याचे पोलिस प्रशासनाने नमूद केले आहे. 

केंद्रीय आरोग्य विभागाचे पथक पाहणीसाठी गुरुवारी (ता. 30) बारामतीत आले होते. "बारामती पॅटर्न'च्या विरोधात त्यांना निवेदन देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे व शहराध्यक्ष सतीश फाळके त्यांच्या डस्टर मोटारीतून सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयामध्ये आले होते. त्यांना पथकाला भेटून निवेदन द्यायचे होते, मात्र पोलिसांनी त्यांना निवेदन देण्यापासून रोखत दमदाटीची भाषा केल्याचे कचरे व फाळके यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

दुसरीकडे पोलिसांनी त्यांना नोटीस देत खुलासा मागितला आहे. नोटीसमध्ये नमूद केले आहे की, दवाखान्याजवळ पोलिसांनी थांबविल्यानंतर माहिती न देता निघून गेले, मुदत संपलेला पास वापरत असून, केंद्रीय पथक येणार असलेल्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात विनापरवाना प्रवेश केला, तेथे येण्याबाबत अत्यावश्‍यक कारण दिसून येत नाही. 
पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी त्यांना नोटीस बजावली असून खुलासा करण्यास सांगितले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com