

भाजयुमो सोलापूर पूर्वची नवी ५३ जणांची कार्यकारिणी जाहीर
महेश बिराजदार यांनी जुन्या - नव्यांचा साधला समतोल; पक्षसंघटन बळकट करण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) सोलापूर पूर्व जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष महेश वैजिनाथ बिराजदार यांनी जाहीर केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी ही ५३ जणांची कार्यकारिणी जाहीर केली आहे. निष्ठावंतांसह पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनाही संधी देत समतोल साधण्यात आला असून यात १२ उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, १४ चिटणीस आणि एका कोषाध्यक्ष, सोशल मीडिया प्रमुख, सहप्रमुख आणि सदस्यांचा समावेश आहे.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ या सर्व तालुक्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. ओमराज बाणेगाव, प्रभाकर बिराजदार, अनुप देवधर आणि विशाल चौधरी यांची जिल्हा सरचिटणीसपदी, तर संतोष पोमाजी, दत्तात्रय डांगे, विशाल जाधव, शिवराज कालदे, प्रथमेश पाटील, केदार कराळे, राम मोरे, अजित लेंडवे, नितीन मोरे, सुनील भोसले, महेश राऊत आणि लिंगराज शेंडगे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आकाश माशाळे यांच्याकडे जिल्हा कोषाध्यक्षपद, सुदर्शन खांडेकर यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुखपद, विनायक बडूरे यांच्याकडे सोशल मीडिया सहप्रमुखपद, ओंकार येणेगुरे यांच्याकडे जिल्हा कार्यालय प्रमुखपद, तर वैभव मुलगे यांच्याकडे जिल्हा कार्यालय सहप्रमुखपद देण्यात आले आहे. याशिवाय विविध तालुक्यांतील युवा कार्यकर्त्यांची जिल्हा चिटणीस व जिल्हा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
दिलीप माने समर्थकांनाही संधी
या कार्यकारिणीत आमदार सुभाष देशमुख गटासह पक्षनिष्ठ व संघटनिष्ठ कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. गत कार्यकारिणीतील काहीना पुन्हा संधी दिली आहे. यात सरचिटणीस प्रभाकर बिराजदार, उपाध्यक्ष विशाल जाधव, शिवराज कालदे, चिटणीस अजय गवसणे, महेश नरसगोंडे, इरप्पा बिराजदार, बनसिद्ध वडरे, कार्यालय सह प्रमुख वैभव मुलगे, सदस्य अक्षय गुरव, धर्मराव पुजारी यांचा समावेश आहे. तर आमदार दिलीप माने यांचे समर्थक, बाजार समिती संचालक प्रथमेश पाटील, पाकणीचे सचिन ढेपे यांचाही समावेश केला आहे.
कोट
PNE26W49140
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपचे संघटनात्मक काम अधिक वेगाने करण्याचा प्रयत्न राहील. पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत युवा कार्यकर्त्यांना संघटित केले जाईल.
महेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, भाजयुमो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.