shirur nagarparishad nitin pacharne and aishwarya pacharne
sakal
शिरूर - शिरूर नगर परिषदेच्या राजकारणात दहा महिन्यांत आज दुसऱ्यांदा नाट्यमय घडामोड़ी घडल्या. नगर परीषदेत दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी या आघाडीतून बाहेर पडण्याचा पवित्रा काही दिवसांपूर्वी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, आज भारतीय जनता पक्षाच्या ११ नगरसेवकांनी सत्ताधारी शिरूर नगर परीषद गटाला पाठिंबा दिला.