

पुणे - पुणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीचे १२ सदस्य निवडताना भाजपने धक्कातंत्राचा वापर केला. स्थायीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या श्रीनाथ भिमाले यांचा अपवाद वगळता अन्य इच्छुकांना समितीमध्ये यंदा स्थान दिले नाही.