Dj Sound System
sakal
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती समितीने ‘नो डीजे’चा विधायक निर्णय घेतला होता. परंतु ससून रुग्णालयासारख्या शांतता क्षेत्रात डीजेच्या आवाजामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू होता. पोलिस प्रशासनाच्या या दुर्लक्षाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिला आहे.