Wari 2025 : दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी घेतली ‘डोळस’ अनुभूती !

Pandharpur Wari : दृष्टिहीन असूनही, यवतमाळच्या तिघा मित्रांनी पुण्यात शिक्षण घेत पंढरपूर वारीत सहभागी होऊन श्रद्धेचा, आत्मविश्वासाचा आणि प्रेरणेचा अद्वितीय संदेश दिला.
Wari 2025
Wari 2025 Sakal
Updated on

पुणे : त्या’ तिघांची दृष्टी नियतीने जन्मतः हिरावून घेतली, तरी, त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती कमी झालेली नव्हती. त्याच जोरावर तिघांनीही गावाला निरोप देऊन शिक्षणासाठी पुण्याची वाट धरली. वेगवेगळ्या महाविद्यालयांत शिक्षण घेताना, एरवी हातात हात घालून, एकमेकांना खंबीर साथ देत बसने फिरणारी ही मित्रमंडळी शुक्रवारी पुण्यातील रस्त्यांवर अगदीच बिनधास्त फिरत होती, त्यांना ना गर्दीची भीती होती, ना वाहनांमुळे अपघात होण्याची. कारण, तिघेही पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या मेळ्यात आनंदाने सहभागी होत, काही किलोमीटर पायी चालून विठ्ठल चरणी सेवा रुजू करत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com