

भोर, ता. १७ : शहरातील वेताळपेठ जुनी तालीम मंडळ यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात ६५ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. यामध्ये तरुणांसोबत तरुणींचाही सहभाग होता. माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार व मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश पवार, नगरसेवक अमित सागळे, तौफीक आतार, नगरसेविका मनीषा पवार, शांताराम शेडगे, देविदास गायकवाड, सुनील पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्यातील अक्षय रक्तपेढीचे डॉक्टर व कर्मचारी यांनी रक्तसंकलन केले. प्रत्येक रक्तदात्यास मंडळाच्या वतीने हेल्मेट भेट देण्यात आले.