पिंपोडे बुद्रुक रक्तदान शिबिर संपन्न
पिंपोडे बुद्रुकमधील रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पिंपोडे बुद्रुक, ता. २४ : येथे (कै.) ऋषी गुरव मित्र समूहाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला ग्रामस्थ व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे हे दुसरे वर्ष होते. यावेळी १२६ जणांनी रक्तदान केले.
या शिबिरासाठी सातारा येथील बालाजी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. गावातील श्री महाजनी महाराज मंदिरात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत हे शिबिर झाले. रक्तदात्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यावेळी न्यायाधीश मोनिका आवळे, वाठार पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी शरद धुमाळ यांनी शिबिराला भेट देऊन या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.
श्री. सातव म्हणाले, ‘‘आजच्या धावपळीच्या काळात रक्ताची गरज प्रत्येक रुग्णालयात सातत्याने भासत असते. अपघात, शस्त्रक्रिया, गंभीर आजार अशा प्रसंगी रक्त जीवनदायी ठरते. त्यामुळे रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून ती मानवतेची खरी सेवा आहे.’’
या उपक्रमातून जिवलग मित्राच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचे काम (कै.) ऋषी गुरव मित्र समूह करत आहे, तसेच इतरांना देखील समाजहिताचा संदेश देण्याचे कार्य होत आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला येत्या काळात चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
---------------------------
01620
पिंपोडे बुद्रुक : रक्तदान शिबिराप्रसंगी रक्तदाते, पोलिस व ऋषी गुरव मित्र समूहातील कार्यकर्ते. (राहुल लेंभे : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

