वाठार कि.शिव प्रतिष्ठान तालिम संघ वाठार कि. मार्फत रक्तदान शिबिर
वाठार किराेलीतील शिबिरात
८५ जणांनी केले रक्तदान
रहिमतपूर, ता. २२ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि धर्मवीर बलिदान मासानिमित्त वाठार किराेली येथील शिव प्रतिष्ठान तालीम संघातर्फे श्री अंबामाता मंदिरात आयोजित रक्तदान शिबिरात ८५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे, श्री. केंद्रे उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुज कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच सुनंदा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक करत रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या हेतूने आयोजित शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. शिव प्रतिष्ठान तालीम संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी संघातर्फे रक्तदान हेच श्रेष्ठ दान, जीवन वाचविण्याचे महान अभियान असा संदेश दिला.
B01629
वाठार किराेली ः रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना विनोद नेवसे. त्या वेळी केंद्रे व मान्यवर.
............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

