इंदापूरच्या तरुणाईला सलाम, कोरोनाच्या लढाईसाठी रक्तदानाचा महायज्ञ

प्रा. प्रशांत चवरे
Wednesday, 27 May 2020

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर इंदापूर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनानी एकत्र येऊन तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास युवकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

भिगवण (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर इंदापूर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनानी एकत्र येऊन तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास युवकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तालुक्यामध्ये 760 व्यक्तींनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन बोगावत यांनी दिली आहे.

भोरच्या रस्त्यांवर मुंबईच्या गाड्यांची गर्दी   

कोरोनामुळे सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याची बाब विचारात घेऊन भारतीय जैन संघटना, श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, भगवानराव भरणे प्रतिष्ठान, रोटरी क्लब, लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन, अमर बौद्ध युवक संघटना, साई प्रतिष्ठान आदी संघटनानी इंदापूर तालुक्यातील भिगवण, निमगाव केतकी, जंक्शन, पळसदेव, अकोले, जैन स्थानक भिगवण आदी ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सामाजिक अंतर राखत व योग्य काळजी घेत रक्दान करण्यात आले. 

शिक्रापूर डेंजर झोनमध्ये, दोघांना कोरोनाची लागण  
 

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद सदस्य हानुमंत बंडगर, जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन बोगावत, शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भूषण सुर्वे, अनिकेत भरणे, मनोज राक्षे, प्रदीप वाकसे, अजिंक्य माडगे, संतोष धवडे, शंकरराव गायकवाड, अमोल देवकाते, कमलेश गांधी, धनंजय थोरात, डॉ. अमोल खानावरे, आबासाहेब देवकाते आदी उपस्थित होते. रक्तदान शिबारास तालुक्यातील युवकांनी भरभरुन प्रतिसाद देत 760 युवकांनी यामध्ये सहभाग घेतला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या रक्तचा भासत असलेला तुटवटा विचारात घेऊन विविध सामाजिक संघटना पुढाकार घेऊन राबविलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे.
 - दत्तात्रेय भरणे,
राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood donation by youth in various places in Indapur taluka