उरुळीच्या भन्साळी यांनी जोपासला गांधीजींचा विचार

उरुळीच्या भन्साळी यांनी
जोपासला गांधीजींचा विचार
Published on

उरुळी कांचनच्या भन्साळी यांनी
जोपासला गांधीजींचा विचार

- सुनील जगताप, उरुळी कांचन

महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेणारे आणि उरुळी कांचनच्या सर्वांगीण विकासासाठी आपली जमीन दान करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक भक्तावरमल ऊर्फ उत्तमचंद मगनीराम भन्साळी (बी. एम. भन्साळी) यांच्या राष्ट्रनिष्ठ कार्याचा गौरव आजही करण्यात येतो.
भन्साळी यांनी ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल येरवडा आणि विसापूर कारागृहात दोन वर्षांचा कारावास भोगला होता. वसंतदादा पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांसारख्या नेत्यांच्या सहवासात त्यांनी राष्ट्रकार्य केले. २२ मार्च १९४६ रोजी महात्मा गांधी उरुळी कांचन येथे आले असता, त्यांच्या वास्तव्याची आणि निसर्गोपचार आश्रमाची पायाभरणी करण्यात भन्साळी यांनी मोलाची भूमिका बजावली

गांधीजींच्या ग्रामसुधारचे पालन
गांधीजींनी ३० मार्च १९४६ रोजी उरुळी कांचन येथूनच दिल्लीला अंतिम वाटाघाटीसाठी जाताना ‘ग्रामसुधार’ हाच राष्ट्रविकासाचा मार्ग असल्याचे सांगितले होते. हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी भन्साळी यांनी स्वतःची जमीन निसर्गोपचार ग्रामसुधार ट्रस्टला दान केली. त्यांनी स्थापन केलेले कस्तुरबा खादी भांडार आणि वाचनालय आजही त्यांच्या समाजसेवेची साक्ष देते. त्याग आणि निस्पृह समाजसेवेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

स्वातंत्र्यसैनिक बी.एम.भन्साळी.
२) २२ मार्च १९४६ रोजी महात्मा गांधी उरुळी कांचन येथे आले होते त्यांच्याबरोबर बी.एम.भन्साळी.
३) उरुळी कांचनच्या प्रथम ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून गांधीवादी विचारवंत डॉ.मणिभाई देसाई यांच्याबरोबर काम करणारे स्वातंत्र्यसैनिक बी.एम.भन्साळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com