
शिरूर : पुणे - अहिल्यानगर महामार्गालगत रांजणगाव गणपती (ता. शिरूर) हद्दीत खंडाळे माथ्याजवळील एका बंद पडलेल्या कंपनीच्या मागील बाजूस आज सकाळी तरूण महिलेसह दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तिहेरी हत्याकांडाचा हा प्रकार असल्याच्या या निष्कर्षाप्रत पोलिस आले असून, त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.