

बारामती, ता. १७ : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथील शरीररचनाशास्त्र विभागाच्या वतीने देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा मंगळवारी (ता. १८) सन्मान करण्यात येणार आहे.
समाजहितासाठी देहदानाचा निर्णय घेणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील. यावेळी देहदान व अवयवदानाचे महत्त्व आणि त्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी या मानवतावादी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.