गुन्हा रद्द करण्यासाठी तोतया मुख्यमंत्री विजय मानेची न्यायालयात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Mane

तोतयागिरी करून प्रतिमा मलिन करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी तोतया मुख्यमंत्री विजय माने याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

गुन्हा रद्द करण्यासाठी तोतया मुख्यमंत्री विजय मानेची न्यायालयात धाव

पुणे - तोतयागिरी करून प्रतिमा मलिन करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी तोतया मुख्यमंत्री विजय माने याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

माने यांनी मुख्यमंत्र्यांची बदनामी केली असेल तर मुख्यमंत्री यांनी स्वत: तक्रार दाखल करावी आणि कायदेशीर कारवाई करावी. विजय माने यांनी ते मुख्यमंत्री असल्याचे कधीही कुणाला सांगितलेले नाही. त्यांनी कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

माने यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये बंडगार्डन पोलिसांना प्रतिवादी करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे वेशभुषा करुन गँगस्टर शरद मोहोळसमवेत छायाचित्र काढून ते समाज माध्यमावर प्रसारित करून मुख्यमंत्री असल्याचे भासवित तोतयागिरी केल्याप्रकरणी माने यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळसमवेत छायाचित्र काढून ते समाज माध्यमामध्ये प्रसारित केले, त्याद्वारे 'आपण मुख्यमंत्री आहोत' अशी तोतयागिरी करत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने व्हॉट्सअप व फेसबुकवरील माहिती घेत असताना त्यासंबंधिचे छायाचित्र मिळाले. त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचे दिसत आहे.

पोलिसांनी विजय माने यांना दाढी काढून टाकत मुख्यमंत्र्यांसारखी वेशभूषा परिधान करण्यास मनाई केली आहे. मात्र हा माने यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा निरर्थक असून, कायद्याच्या दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

- ॲड. असीम सरोदे, याचिकाकर्त्यांचे वकील

Web Title: Bogus Chief Minister Vijay Mane Approached High Court To Quash The Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..