
दौंड : दौंड शहराच्या भरबाजारपेठेतील एक मोबाइल विक्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील ५७ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तर भरचौकातील अन्य एका गॅस एजन्सी दुकानाचे शटरच्या कुलूप लावण्याच्या दोन कड्या अवघ्या १६० सेकंदात तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता.