
औंध : बावधन परिसरातील एका नामांकित खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ई-मेल शाळा व्यवस्थापनाला प्राप्त झाल्याने गुरुवारी (ता. १३) खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने शाळेच्या परिसरात तपासणी केल्यानंतर बॉम्ब नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.