Bomb Threat for Pune Airport : पुणे विमानतळ बॉम्बनं उडवण्याच्या धमकीनं खळबळ! 72 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

सुरक्षा तपासणीच्या मुद्द्यावरुन या महिलेनं ही धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
Pune Airport
Pune Airportsakal

पुणे विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली आहे. एका ७२ वर्षी वृद्ध प्रवाशी महिलेनं ही धमकी दिल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या महिलेवर विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Bomb threat of Pune Airport FIR registered against a 72 year old woman)

Pune Airport
Delhi Services Bill: दिल्ली विधेयकाचं आज राज्यसभेत काय होणार? जाणून घ्या NDA, INDIAचं बलाबल

कोण आहे ही महिला?

नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता कृपलानी ही महिला विमानतळावर गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आली.

तिने विमानतळावरील बूथमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिसांना 'मेरे चारों तरफ बम लगा है' असं सांगितलं. त्यामुळं तेथील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची झडती घेतली असता ती अफवा असल्याचं स्पष्ट झाले.

Pune Airport
Mumbai Local Train Update : सकाळी ७ वाजल्यापासून कर्जत-कल्याण लोकल वाहतूक विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी दीपाली बबनराव झावरे (रा. कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. आर. करपे करीत आहेत.

Pune Airport
WI vs IND T20: लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पांड्या संतापला! 'या' खेळाडूंवर फोडले खापर

'या' कारणामुळं दिली धमकी

या महिलेनं अशी धमकी का दिली याचं कारणंही समोर आलं आहे. सुरक्षा तपासादरम्यान वेळ लागत असल्यानं वैतागल्यानं या महिलेनं आपल्या शरिरावर चारही बाजूनं बॉम्ब लावले असल्याचं सुरक्षा रक्षकांना सांगितलं. पुणे ते दिल्ली या फ्लाईटनं ही महिला प्रवास करणार होती. या महिलेवर गुन्हा दाखल झाला असून तिला कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com