The court observed that a senior citizen should not be forced to struggle for justice in a property fraud dispute.
Esakal
पुणे : कौटुंबिक मालमत्तेच्या वादात ७८ वर्षीय ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरू देता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने पुणे सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. वडगाव शेरी येथील भूखंड प्रकरणात दाखल गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी चंदननगर पोलिसांना दिला आहे.