Pune News : अन्ननलिकेत हाड अडकून छिद्र झाले; डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे काढले!
पुणे - इंदापूर येथील एका ७० वर्षीय वृद्धाने विवाह सोहळ्यात मांसाहार असलेले जेवण करताना चुकून हाडही गिळले. ते अन्ननलिकेत आडवे होऊन अडकले. या हाडामुळे रुग्णाच्या अन्ननलिकेत छिद्र झाले.
त्यामुळे रुग्णाला पाणीदेखील पिता येत नव्हते व श्वासही घ्यायला त्रास होत होता. ससून रुग्णालयातील शल्यविषारदांच्या पथकाने ‘एंडोस्कोपी’द्वारे यशस्वीपणे हाड बाहेर काढून त्याला जीवनदान दिले. तसेच अन्ननलिकेचे छिद्र बुजविण्यासाठी स्टेंटही टाकला.
२४ फेब्रुवारी रोजी इंदापूरमध्ये एका विवाह सोहळ्यात जेवताना त्यांनी चुकून हाड गिळले होते. त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. पुढील दोन दिवसांत रुग्णाला स्थानिक वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचार न झाल्याने त्यांना शेवटी त्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी सीटी स्कॅनद्वारे हाडाची अचूक स्थिती शोधून काढली.
हाडाचे आकारमान ५.३ बाय ३ सेमी होते आणि ते आडवे अडकले होते. रुग्णाचे वय लक्षात घेता शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरले असते, म्हणून एंडोस्कोपीद्वारे हाड काढले. ही शस्त्रक्रिया २७ फेब्रुवारी रोजी शल्यविशारद (सर्जरी) विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पद्मसेन रनबागळे यांच्या नेतृत्वाखाली कान नाक घसा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल ठाकूर, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. नेहा कांबळे, डॉ. सुजित क्षीरसागर यांच्या चमूने केले.
गुंतागुंतीची व दुर्मिळ शस्त्रक्रिया
रुग्णाचे वय आणि हाडाची अन्ननलिकेत असलेली जागा अत्यंत धोकादायक होती, कारण ते हृदय, महत्त्वाच्या रक्तवाहिन्या किंवा अन्ननलिकेत आणखी मोठे छिद्र करू शकले असते. ते हृदयाच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांच्या अगदी जवळ असल्यामुळे प्राणघातक ठरू शकले असते. हाडाने अन्ननलिकेला छिद्र पडल्यामुळे त्यातून अन्न किंवा पाणी इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये जाऊन अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता होती. हे टाळण्यासाठी डॉक्टरांनी अन्ननलिकेत स्टेंट बसवला.
'हाड काढल्यानंतर अन्ननलिकेत झालेल्या छिद्रांमुळे पचनसंस्थेत अन्न किंवा द्रवपदार्थ जाण्याचा धोका होता. त्यामुळे आम्ही स्वयं प्रक्रियेद्वारे फुगणारा लवचिक स्टेंट बसवला. हा स्टेंट ६ महिने राहील आणि जखम पूर्ण बरी झाल्यानंतर तो काढण्यात येईल.'
- डॉ. पद्मसेन रनबागळे, शल्यविशारद
'ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती, कारण रुग्णाचे वय, हाडाची जागा आणि परिणामी होणारे संभाव्य धोके यामुळे मोठी आव्हाने होती. ससूनच्या डॉक्टरांनी यशस्वीरीत्या हाड काढले आणि रुग्ण दुसऱ्याच दिवशी पानी देखील पिऊ शकला.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
