उन्हाळी सुट्यांचे करा बुकिंग!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

पुणेकरांचे पर्यटन व आगामी उन्हाळी सुट्यांचे बुकिंग अगदी सोपे व्हावे, नव्हे ते एक सेलिब्रेशनच व्हावे, या हेतूने ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.

पुणे - पुणेकरांचे पर्यटन व आगामी उन्हाळी सुट्यांचे बुकिंग अगदी सोपे व्हावे, नव्हे ते एक सेलिब्रेशनच व्हावे, या हेतूने ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येत्या २४ ते २६ जानेवारी दरम्यान कर्वेनगर येथील पंडित फार्म येथे सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत तो होणार आहे. सकाळ हॉलिडे कार्निव्हल पॉवर्ड बाय गिरिकंद ट्रॅव्हल्स असून, सहप्रायोजक एमएफडब्ल्यू ट्रॅव्हल्स हे आहेत. यासाठी ट्रॅव्हलॉरचे संदीप देसाई यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

‘सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर’

देशात पर्यटन करताना कॅमेराबद्ध केलेला क्षण, तुमच्या परफेक्‍ट फोटो अँगलला हक्काचे व्यासपीठ देण्याच्या दृष्टीने ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित केलेल्या ‘सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर २०२०’ या स्पर्धेला लक्षणीय प्रतिसाद लाभला. त्यातील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’मध्ये मांडले जाणार आहे. तुम्ही काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी कुटुंब, स्नेहीजनांनाही सोबत घेऊन या आणि उन्हाळी सुट्यांचे नियोजन करा. तसेच, फिस्टचा आनंदही इथल्या फूड स्टॉल्समधून घ्या. या प्रदर्शनातील सर्वोत्तम छायाचित्रासाठी पारितोषिक दिले जाणार आहे.

कार्निव्हलमध्ये काय?
  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन्ससाठीचे टूर बुकिंग एकाच छताखाली.
  नामवंत ५० हून अधिक टूर अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांचा सहभाग
  तीनशेहून अधिक सहली व डेस्टिनेशनचे विविध पर्याय उपलब्ध.
  ग्रुप व सोलो टूर्स (कस्टमाईज टूर्स) प्लॅनिंगसाठीचा पर्याय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Booking For Summer Holidays