100 bikes gives to pune police
sakal
पुणे - 'पुणे ग्रँड टूर २०२६' या सायकल स्पर्धेसाठी चारशे सीसी इंजिन क्षमता असलेल्या शंभर दुचाकी पोलिसांना सोमवारी देण्यात आल्या. या दुचाकी स्पर्धेतील सायकल स्पर्धेच्या मार्गावर असणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आणि ग्रामीण पोलिसांसाठी या दुचाकी दिल्या असून स्पर्धेनंतर पोलिस दलासाठी दैनंदिन वापरासाठी या दुचाकींची मदत होणार आहे.