
कोंढवा : मागील वर्षी बोपदेव घाटात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांकडून काळजी घेत घाट परिसर हायटेक करण्याकडे पावले टाकली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित करत आयपी स्पिकर्स व आपत्कालीन कॉल बॉक्स बसविण्यात आले आहेत. तसेच, लवकरच रात्रीच्या अंधारासाठी फ्लड लाईट्स लावण्यात येणार आहेत.