Pune News: बोपोडी येथील ७० वर्षे जुनी डॉ. राजेंद्रप्रसाद प्राथमिक शाळा धोकादायक स्थितीत असून तिच्या पुनर्विकासाची मागणी जोर धरू लागली आहे. ४५० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिकांनी आंदोलन छेडले.
औंध : बोपोडी येथील महापालिकेच्या डॉ. राजेंद्रप्रसाद प्राथमिक विद्यालयाची इमारत जुनी झाल्याने धोकादायक बनली आहे. त्यामुळे इमारतीच्या पुनर्विकासाची मागणी होत आहे. बोपोडीतील स्थानिक रहिवाशांच्या वतीने त्या संदर्भात आंदोलन करण्यात आले.