

PNE26W40526
बोरामणी : येथील दगडी चक्रव्यूहची पाहणी करताना डॉ. पी. डी. साबळे, नेताजी खंडागळे, दत्ता डांगे व राज सांळुखे.
बोरामणी येथील दगडी चक्रव्यूहची पाहणी
ऐतिहासिक वारशाच्या जतन; संवर्धन करण्याची स्थानिकांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील गवताळ माळरानावर डिसेंबर २०२५ मध्ये आढळलेल्या दगडी चक्रव्यूहाची पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. साबळे यांनी पाहणी केली. यावेळी बोरामणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य नेताजी खंडागळे यांनी या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे अशी मागणी केली.
धाराशिव व सोलापूर सीमेवरील बोरामणी येथे सुमारे २,००० वर्षे जुन्या (सातवाहन काळातील) आणि १५ वर्तुळांचे, ५०×५० फूट आकाराचे भव्य दगडी ‘चक्रव्यूह’ (लॅबिरिन्थ) आहे. या ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी डेक्कन कॉलेजचे पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. साबळे यांनी या चक्रव्यूहाचा इतिहास, पुरातत्त्वीय महत्त्व आणि संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी बोरामणीचे सरपंच राज साळुंखे, दत्ता डांगे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. भारतातील सर्वात मोठा वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि जतन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे यावेळी डॉ. साबळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.