बोरामणी तिहेरी हत्याकांडातील सर्व संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी

बोरामणी तिहेरी हत्याकांडातील सर्व संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी
Published on

बोरामणी तिहेरी हत्याकांडातील संशयित न्यायालयीन कोठडीत

सोलापूर, ता. १५ : पतीच्या वडिलोपार्जित शेतजमिनीत हिस्सा आणि हातउसने दिलेल्या २५ लाख रुपयांसाठी तगादा लावणाऱ्या वहिनी व तिच्या दोन मुलांचा दिरानेच निर्घृण खून केल्याची घटना बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे १ मे रोजी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता सर्व संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

बोरामणी येथील मस्के वस्तीवर राहणाऱ्या शंकर ऊर्फ पप्पू मस्के याच्या दोन भावांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र, तो वहिनी गायत्री सुधाकर मस्के यांना त्यांच्या पतीच्या वाट्याची जमीन देत नव्हता. तसेच हातउसने घेतलेले पैसेही परत करत नव्हता. यावरून गायत्री मस्के आणि शंकर मस्के यांच्यात सातत्याने वाद होत होते. त्याच रागातून शंकरने वहिनीसह तिच्या दोन्ही मुलांचा खून केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मयत गायत्री मस्के यांच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शंकर मस्के, त्याची पत्नी राणी, मुलगी दीक्षा, मुलगा धीरज, मेव्हणा सूरज माधवराव मोरे आणि त्याचा मित्र सचिन शिवाजी वाघमारे यांना अटक केली आहे. या हत्याकांडाचा तपास सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे करीत आहेत. पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतरही पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com