

उत्रौली, ता. १५ : ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी लावलेली टोकरी काढण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना समोरून बिबट्यासह दोन बछडे येताना दिसले. क्षणाचाही विलंब न लावता पळ काढल्याने तरुण बचावले. ही घटना शनिवारी (ता. १४) दुपारी तीनच्या सुमारास नेरे-निळकंठ (ता. भोर) येथील ओढ्याजवळ घडली आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
किवत (ता. भोर) येथील दोन तरुणांनी शुक्रवारी (ता.१३) लावलेली टोकरी काढण्यासाठी शनिवारी नेरे येथील ओढ्यावर गेले होते. दरम्यान, तरुणांनी बिबट्या आपल्याकडे येत असल्याचे पाहताच हातातील खेकड्यांची टोकरी बिबट्याच्या दिशेने फेकून देऊन धूम ठोकली. याच दरम्यान, परिसरात रानडुकरांचा कळप होता. यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती तरुणांची झाली होती.
वीसगाव खोऱ्यात मागील चार महिन्यांत बिबट्या वारंवार शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. यामुळे शेतकरी शेतात काम करण्यास भीत आहेत. तसेच रात्री कामावरून येणाऱ्या दुचाकीस्वारांमध्ये व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आठ दिवसांपूर्वी वरवडी-नेरे मार्गावर पळसोशी फाट्यावर रात्रीच्या वेळी दुचाकीचालकांच्या समोरच रस्त्यावर बिबट्या आला होता. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.