

Holiday Rush Creates Chaos On Mumbai Highway
Esakal
Heavy Traffic Jam Hits Borghat Ghat लोणावळा, ता. २४ : प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांना बोरघाटात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. घाटात पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व जुन्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या असून तासनतास सुरू असलेल्या 'स्टॉप अँड गो' प्रकारामुळे शेकडो वाहनांच्या क्लच प्लेट निकामी झाल्या. त्यामुळे ऐन घाटात वाहने नादुरुस्त होऊन थांबल्याने कोंडीत अधिकच भर पडली आहे.