

Traffic Jam
sakal
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील बोरघाटात शनिवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. वीकएन्ड आणि सुट्टीच्या दिवसांमुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. पूर्ण दिवस कोंडीचा ठरल्याने प्रवासी त्रस्त झाले.