बोरीतील वस्तुसंग्रहालयासाठी प्रयत्न करणार : मेधा कुलकर्णी
आळेफाटा, ता. ७ : ‘‘बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) गावात स्पर्धा परीक्षा केंद्र, वस्तुसंग्रहालयासाठी प्रयत्न करणार असून, गावातील कृषी उत्पन्न, महिला बचत गटांचे लघू उद्योगातील खाद्यपदार्थ, केंद्रीय भाजीपाला व उत्पादने यासाठीही पुणे येथे बाजारपेठेची उपलब्धता करून देणार आहे,’’ असे आश्वासन राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिले.
अश्मयुगाची ओळख जगाला देणाऱ्या बोरी बुद्रुक गावाला भेट दिल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना त्या बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार अतुल बेनके, श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्ट ओझरचे अध्यक्ष गणेश कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास दरेकर, माजी सरपंच पुष्पा कोरडे, मोजणी समितीचे अध्यक्ष रंजन जाधव, पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन संस्था बोरी बुद्रुकचे अध्यक्ष अमोल कोरडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष युवराज कोरडे, माजी उपसरपंच रखमा जाधव, निवृत्त विक्रीकर उपायुक्त दत्तात्रेय फुलसुंदर, ग्रामपंचायत सदस्या कोमल कोरडे, स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सर्व सेवेकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी खासदार कुलकर्णी यांनी डेक्कन कॉलेज व पुरातत्त्व विभाग पुणे यांनी केलेल्या उत्खननात बोरी बुद्रुक गावात सापडलेली अश्मयुगीन दगडी हत्यारे, दोन मीटर लांबीचे हस्तिदंत, पुरातन जीवाश्म व इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात डोकावणाऱ्या या गावचा इतिहास जाणून जाणून घेतला. बाबासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक केले. केदार तपस्वी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

