

बोरी नदीवरील चार बंधारे होणार नियंत्रित
सर्वेक्षणासाठी निविदा; अहवाल शासनाकडे पाठविणार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ : अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीवरील चार जुन्या बंधाऱ्यांचे रूपांतर नियंत्रित बंधाऱ्यांमध्ये करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उजनी कालवा विभाग क्रमांक ८ ने ५५ लाख रुपयांची सर्वेक्षण व अन्वेषणाची निविदा काढली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
बोरी नदीवर सध्या एकूण ११ बंधारे आहेत. त्यापैकी चार बंधारे जुने व जीर्ण झाले असून, पाण्याचे प्रभावी नियंत्रण आणि साठवण करण्यासाठी त्यांचे रूपांतर करण्याचे नियोजन आहे. सध्या या बंधाऱ्यांवर पाण्याच्या पातळीचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक दरवाजांची व्यवस्था नसल्याने पाण्याचे नियोजन करणे अडचणीचे ठरते. प्रस्तावित नव्या बंधाऱ्यांमध्ये हायड्रॉलिक मॉनिटरिंग सिस्टीमसह नियंत्रित दरवाजे बसविण्याचे नियोजन आहे.
या यंत्रणेमुळे नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाह यांचे अधिक प्रभावीपणे नियंत्रण करता येणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी अधिक चांगल्या पद्धतीने वापर होण्यास मदत होणार आहे.
या बंधाऱ्यांचे रुपांतरण
उजनी कालवा विभागाने अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीवरील अक्कलकोट, मिरजगी, सांगोळी (ब) व बबलाद परिसरातील बंधाऱ्यांच्या रूपांतरणासाठी सर्वेक्षण व अन्वेषणाचे काम प्रस्तावित केले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होईल.
कोट
बोरी नदीवर अकरा बंधारे आहेत. सध्या त्यापैकी चार बंधाऱ्यांचे रूपांतरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण झाल्यानंतर प्रकल्प अहवाल सरकारला पाठविण्यात येईल.
- मकरंद म्याकल, उपकार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्रमांक ८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.