पुणे : लोणीत 25 लाखाचा गुटखा पकडला; दोघानां अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

- लोणी काळभोर येथील पोलिसांनी लोणी गावातील अंबरनाथ मंदीराजवळ शनिवारी (ता. 24) सकाळी आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला.

- तर पंचवीस लाख रुपये किंमतीचा गुटखा यावेळी पकडला आहे.

लोणी काळभोर : येथील पोलिसांनी लोणी गावातील अंबरनाथ मंदीराजवळ शनिवारी (ता. 24) सकाळी आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला. तर पंचवीस लाख रुपये किंमतीचा गुटखा यावेळी पकडला आहे. या प्रकरणी गुटखा व्यापारी नवनाथ काळभोर आणि त्याच्यासाठी काम करणारा ट्रक चालक या दोघांना ताब्यात घेतले आहे. 

शनिवारी सकाळी दोन इसम अंबरनाथ मंदीराजवळ ट्रक मधुन गुटख्याची ने आण करत असल्याची माहिती पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ननवरे आणि त्यांच्या सहकार्यांनी वरील कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both arrested as gutkha of twentyfive lakhs found