पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

या प्रकरणी अक्षय भाऊसाहेब दंडवते (वय २२, राहणार सविंदणे (ता. शिरूर) याला अटक केली असून तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर तरूणीला जावे मारण्याचा प्रयत्न मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी...

नारायणगाव : एकतर्फी प्रेमातून हवेत गोळीबार करून धमकावून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना येथील पुणे नाशिक महामार्गावर जांबुत फाटा येथे घडली. या प्रकरणी सविंदणे (ता. शिरूर) येथील तरुणाला आज पहाटे अटक केली आहे. आरोपीकडून पिस्तूल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

या प्रकरणी अक्षय भाऊसाहेब दंडवते (वय २२, राहणार सविंदणे (ता. शिरूर) याला अटक केली असून तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर तरूणीला जावे मारण्याचा प्रयत्न मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत सहायक पोलिस निरीक्षक घोडे पाटील व पोलीस नाईक एन.सी.जढर यांनी दिलेल्या माहितीनुसार अवसरी (ता. आंबेगाव) येथील एकवीस वर्षीय तरूणी व आरोपी तरुण हे मंचर येथे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख होती. माझे तुझ्यावर प्रेम आहे तू माझ्याबरोबर लग्न कर असा तगादा अक्षय दंडवते याने तरूणीच्या मागे दोन वर्षां पासून लावला होता. या बाबत या पुर्वी मुलीने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान तरुणी आळेफाटा येथील सूर्या पोलिस अकॅडमीमध्ये पोलिस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी दाखल झाली होती. सध्या तरुणी जांबुत फाटा येथील नातेवाईकांकडे राहत होती. अक्षय दंडवते हा सध्या वाफगाव (ता. खेड) येथे नातेवाईकांकडे रहात होता. तरुणी रविवारी सायंकाळी मैत्रीनी सोबत आळेफाटा येथून दुचाकीवरून जांबुतफाटा येथे येत असताना अक्षय याने तरुणीला थांबवले. तुझ्या बरोबर बोलायचे आहे. तू माझ्या बरोबर चल असे म्हणून तरुणीला अक्षय याने धमकावले. तरुणी येण्यास नकार देत होती.या प्रकारामुळे स्थानिक नागरिक जमा झाले. धमकवण्यासाठी अक्षय याने पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला.नागरिक जमा झाल्यामुळे तो दुचाकीवरून फरार झाला.या बाबतची तक्रार तरुणीने रात्री नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली.आज पहाटे साडेतीन वाजता आरोपीला पोलिसांनी अटक केली. अशी माहिती घोडे पाटील यांनी दिली.