अनैतिक संबंधाच्या रागातून केला खून; शरीराचे तुकडे टाकले भीमा नदीत!

डॉ. संदेश शहा
Thursday, 21 January 2021

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संजय महादेव गोरवे
(वय २३, रा. टाकळी ता. माढा जि. सोलापूर) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला.

इंदापूर : गणेशवाडी-बावडा (ता. इंदापूर) येथे भीमा नदीच्या गारअकोले पुलाजवळील नदीपात्रात नातेवाईक महिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संजय महादेव गोरवे
(वय २३, रा. टाकळी ता. माढा जि. सोलापूर) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला.

सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण​

मृत युवकाचे धारदार हत्याराने दोन्ही हात-पाय तसेच डोके तोडून धड नदीपात्रात टाकण्यात आले. यासंदर्भात मृताची आई मंजूषा महादेव गोरवे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ४ आरोपीं विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पैकी २ आरोपींना (ता. २० जानेवारी रोजी) अटक करण्यात आली असून एक विधी संघर्ष ग्रस्त अल्पवयीन आरोपीस (ता.  २१ जानेवारी रोजी) ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली.

मृत संजय गोरवे याचे जवळच्या नातेवाईक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी दादा कांबळे (रा. बावड़ा), विकी उर्फ व्यंकटेश भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे (रा. टाकळी ता. माढा) तसेच अल्पवयीन आरोपीस होता. त्यातून
(ता. १७ जानेवारी रोजी) सर्व आरोपींनी संगनमत करून संजय यास दादा कांबळे यांच्या घरी जेवण्यास बोलावले. त्यानंतर गणेशवाडी-बावडा गावच्या हद्दीत भीमा नदीपात्रालगत मोटार सायकलने येऊन आरोपींनी दबा धरला. संजय तेथे येताच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचे हात, पाय व धड वेगळे करून धड नदीपात्रात टाकून दिले.

 
सीरममध्ये भीषण आग; कोविशिल्ड लसीचा प्लांट सुरक्षित आहे का?

दरम्यान, हा गुन्हा ता. १७ जानेवारी ते ता. २० जानेवारीदरम्यान  घडला. पोलीस निरीक्षक  सारंगकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव, दाजी देठे व पोलीस सहकाऱ्यांनी भीमा नदी पात्रालगत जावून संजय गोरवे याचे पार्थिव ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a boy murder in indapur taluka