खतरनाक खिलाडी 2 पाहिला, कारचा झाला मोह अन् जिगरी मित्रालाच संपविले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

अब्दुल अहाद तय्याब सिद्दीकी (वय - 17 रा. दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, उमर नसीर शेख (वय 21 रा. खडकी) असे आरोपी मित्राचे नाव आहे. आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड : महागडी कार घेण्यासाठी मित्रानेच मित्राचे चाळीस लाख रुपयांसाठी अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पुणे शहरातील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घडली आहे. दरम्यान, खतरनाक खिलाडी 2 हा चित्रपट पाहून यातून प्रेरणा घेऊन खून केल्याची कबुली आरोपीने भोसरी पोलिसांना दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अब्दुल अहाद तय्याब सिद्दीकी (वय - 17 रा. दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, उमर नसीर शेख (वय 21 रा. खडकी) असे आरोपी मित्राचे नाव आहे. आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे : नाचताना लागला धक्का म्हणून विद्यार्थ्यास जबर मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमर नसीर शेख याने खतरनाक खिलाडी 2 हा चित्रपट पाहिला. यातून प्रेरणा घेऊन मित्राचे अपहरण करत 40 लाख रुपयांची खंडणी उकळायची अशी योजना आखली. त्यानुसार, रात्री साडेआठच्या सुमारास दापोडी येथील अब्दुलच्या घरी जाऊन त्याला दुचाकीवरून पुणे विद्यापीठाच्या कॅम्पस येथे घेऊन गेला. दोघांमध्ये बिअरची पार्टी झाली. त्यानंतर मात्र आरोपी उमरने मित्राचा गळा आवळून खून केला. दरम्यान, मयत अब्दुलच्या घरच्या व्यक्तीला फोन लावून 40 लाख रुपयांची खंडणी मागितली. परंतु, मयत अब्दुलचे वडील हे भंगारचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. 

आरोपी उमरला कोणीतरी चुकीची माहिती दिली होती. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत अस सांगण्यात आलं होतं. आरोपीला महागडी कार घ्यायची होती. दरम्यान, आरोपी आणि मयत यांनी अनेकदा कॅम्पसमध्ये बिअर पार्टी केली होती, असे पोलिसांनी सांगितले. अवघ्या काही तासातच आरोपीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A boy murdered his friend for a car in Pimpari Chinchwad