सिनेकलाकारांच्या टपाल तिकिटांचा छंद; बोयत यांच्या संग्रहाची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

चित्रपटातील आवडत्या कलाकारांचे फोटो किंवा त्यांच्या सह्यांचा संग्रह करणे ही अनेकांची आवड असते. मात्र, पुण्यातील संदीप बोयत हे सिनेप्रेमी गेल्या सहा वर्षांपासून चित्रपटातील कलाकारांचे टपाल तिकिटं जमा करण्याचा अनोखा छंद जोपासत आहेत. भारतीय चित्रपट क्षेत्राला १०७ वर्षे पूर्ण झाली असून, या वर्षांमध्ये चित्रपट विषयी टपाल खात्याने आजवर काढलेली तिकिटं संदीप यांच्याकडे संग्रहित आहेत. नुकतेच त्यांचे नाव ’लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड’मध्ये झळकले आहे.

पुणे - चित्रपटातील आवडत्या कलाकारांचे फोटो किंवा त्यांच्या सह्यांचा संग्रह करणे ही अनेकांची आवड असते. मात्र, पुण्यातील संदीप बोयत हे सिनेप्रेमी गेल्या सहा वर्षांपासून चित्रपटातील कलाकारांचे टपाल तिकिटं जमा करण्याचा अनोखा छंद जोपासत आहेत. भारतीय चित्रपट क्षेत्राला १०७ वर्षे पूर्ण झाली असून, या वर्षांमध्ये चित्रपट विषयी टपाल खात्याने आजवर काढलेली तिकिटं संदीप यांच्याकडे संग्रहित आहेत. नुकतेच त्यांचे नाव ’लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड’मध्ये झळकले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बोयत म्हणाले, ‘‘माझे वडील हे सहाय्यक कॅमेरामन म्हणून चित्रपटांमध्ये काम करायचे. त्यामुळे चित्रपट क्षेत्राशी संबंध पहिल्यापासून होता. या दिग्गज कलाकारांना मानवंदना म्हणून मी कलाकारांच्या टपाल तिकिटांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. चित्रपट सृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा भारत सरकारने सिनेसृष्टीतील कलाकारांचे चित्र असलेले टपाल तिकिटं काढली होती. ही सर्व तिकिटे मी वेगवेगळ्या प्रदर्शनातून जमा केली. यामध्ये केवळ हिंदी नाही तर मराठी, दाक्षिणात्य आणि हॉलिवूडमधील अभेनेते, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, लेखक अश्‍या सर्व कलाकारांच्या टपाल तिकिटांचा समावेश आहे. सुमारे ५३० हून अधिक टपाल तिकिटांचा संग्रह केला असून ‘द कलेक्‍शन ऑफ बॉलिवूड स्टॅम्पस’ नावाने ते ओळखले जाते.’’ या संग्रहाचे प्रदर्शन भरविणार असल्याचेही बोयत यांनी सांगितले.

कलाकारांच्या टपाल तिकिटांचा संग्रह करणारे संदीप बोयत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boyats collection of postage stamp hobbies recorded in Limca Book